Death certificate मृत्यू दाखला मृत्यू प्रमाणपत्र आवशक्य माहिती
व्यक्तीच्या मृत्युनंतर २१ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे.त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमानपत्र दिले जाते. ज्यात व्यक्तीचे नाव, मृत्यूचे कारण, वेळ, दिनांक ,इ.माहिती नमूद असते.
१ व्यक्ती मृत आहे हे कायदेशीर प्रमाणित करण्यासाठी.
२.न्यायालयीन प्रकरणामध्ये.
३. वारसाहक्क प्रमाणपत्र काढण्यासाठी सिद्ध करण्यासाठी .
४. मयत व्यक्तीचा विमा असल्याचा विमा रक्कम प्राप्तीसाठी व इ. महत्वाच्या सरकारी कामांसाठी होतो.
मृत्यू प्रमाणपत्र प्राप्तीसाठी पद्धत
. जर व्यक्ती घरी मयत झाली असेल तर मयताच्या कुटुंबाच्या जेष्ठ व्यक्तीने जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयात मयत व्यक्तीची माहिती द्यावी.
.जर व्यक्ती दवाखान्यात मयत झाली असेल तर चिकित्सा प्रभारी द्वारा
. जर व्यक्ती जेलमध्ये मयत झाली असेल तर जेलप्रमुख द्वारा
. व्यक्ती बेवारस अवस्थेत मयत झाली असेल तर सम्बन्धित गावातील सरपंच/पोलिस पाटील द्वारा.
व्यक्तीच्या मयत होण्याच्या सूचनेत नंतर २१ दिवसाच्या आत कार्यालयाच्या विहित नमुन्यातील प्रपत्र भरल्यावर मृत्यूची सत्यता पडताळून मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.
अ. एक वर्षावरील मृत्यू नोंदणीचा दाखलासाठी लागणारी कागदपत्रे
.विहीत नमुन्यातील कोर्ट फी स्टँप लावलेला अर्ज व शपत पत्र.
.ग्रामसेवक यांचा दाखला.
.वैद्यकीय अधिकारी /आरोग्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र
ब. जिल्हा परिषदेसाठी मृत्यू दाखला करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे
.विहित नमुन्यातील अर्ज व अंगणवाडी / आशावर्कर यांचा मृत्यूचा अहवाल दिनांकासह.
.वैद्यकीय अधिकारी यांचा रिपोर्ट दिनांकासह.