admin
Posts by :
- AAPLESARKAR
- DASTAAIVAJA
- INDEX
- Softwares
- Uncategorized
- अन्न
- अल्पसंख्यांक विकास विभाग
- आस्थापना किंवा व्यावसयिक
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग
- उद्योग विभाग
- उर्जा विभाग
- करमणूक कर
- कामगार विभाग
- कृषी
- गृह विभाग
- गृहनिर्माण विभाग
- ग्रामविकास व पंचायत राज विभाग
- जलसंपदा विभाग
- दाखले
- नगर विकास
- नागपूर महानगरपालिका
- नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
- नोंदणी व मुद्रांक विभाग
- पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
- परवाना
- परिवहन विभाग
- पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग
- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग
- प्रमाणित प्रत
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
- भूमि अभिलेख विभाग
- मत्स्यव्यवसाय विभाग
- महसूल विभागां
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
- महिला व बाल विकास विभाग
- योजना
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- वन विभाग
- विधी व न्याय विभाग
- वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग
- वैयक्तिक सेवा
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
- शासन मुद्रण
- शिधापत्रिका
- सहकार
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- सार्वजनिक आरोग्य विभाग
- सार्वजनिक बांधकाम विभाग
महाराष्ट्रातील भाडेकरारांसाठी नोंदणी कायदे आणि मुद्रांक शुल्क
महाराष्ट्रातील भाडे करार करण्यासाठी किती रकमेचा मुद्रांक शुल्क भरावा लागतो आणि त्याविषयीच्या कागदपत्रांसाठी काय कायदे अस्तित्वाआत आहे? आम्ही हे आता स्पष्ट करतो.
मालमता भाड्याने देतांना किंवा एखादी जागा भाडे कराराने घेतांना बऱ्याच कायदेशीर औपचारिकतेला सामोरे जावे लागते. भाडेकरार करतांना त्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते
आणि त्याची नोंदणी करावी लागते. मुद्रांक शुल्क हा राज्यांचा विषय असल्याने, सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे मुद्रांक शुल्क भरावे लागते. ईथे, आपण महाराष्ट्रातील भाडेकरारासाठी
लागू असलेल्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या कायद्या विषयी चर्चा करणार आहोत.
मुद्रांक शुल्काच्या तरतुदीभारतीय मुद्रांक कायद्याची मूलभूत संरचना १८९९ मध्येच घातली गेली, ज्यामध्ये राज्यांना गरजेप्रमाणे बदल करण्याची मुभा दिली गेली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने बॉम्बे मुद्रांक अधिनियम कायदा १९५८ साली पास केला. भाडेकरारावरील मुद्रांक शुल्क देयक बॉम्बे मुद्रांक अधिनियम कायदा १९५८ च्या आर्टिकल ३६ए नुसार संरक्षित केले गेले.
भाडेकरारात नोंदविलेल्या काळातील संपूर्ण भाडे देयकाच्या ०.२५ टक्के रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून भरावी लागते. जर मालमता धारकाला नॉन रिफंडेबल डिपॉजिट जर दिले असेल तर अशा डिपॉजिटवर सारख्याच दराने मुद्रांक शुल्क लावले जाईल.
मुद्रांक शुल्क देयक टाळण्यासाठी साधारण भाडे देऊन व्याजविरहित लक्षणीय डिपॉजिट देण्याचे प्रकारही काही व्यक्तींकडून केले जातात. अशा प्रकारे जिथे व्याजविरहित परतावा मिळणारे डिपॉजिट मालमता धारकाने स्वीकारले असेल, अशा डिपॉजिटवर करारकालावधीच्या प्रत्येक वर्षांसाठी वार्षिक १० टक्के व्याज लावले जाईल आणि मुद्रांक शुल्क हे नेहमीच्या दरातच भरावे लागेल.
व्यावसायिक मालमत्ता व रहिवासी मालमत्तेच्या भाडेकरारासाठी मुद्रांक शुल्काचा दर एकच आहे. भाडेकरार अमलात आणण्यासाठीचा काळ हा ६० महिन्यापेक्षा जास्त असू नये.
भाडेकराराच्या मुद्रांक शुल्काची गणना करण्यासाठीचे सूत्र
महिन्याचे भाडे X महिन्यांची संख्या = A
आगाऊ भरलेले भाडे /नॉन रिफंडेबल डिपॉजिट = B
१० % X रिफंडेबल डिपॉजिट X कराराचा वार्षिक काळ = C
मुद्रांक शुल्कासाठी अधीन रक्कम = D = A+B+C
मुद्रांक शुल्क = E = ०.२५ X D
उदाहरणार्थ, जर तुम्ही भाडेकरार २५,००० रुपये प्रति महिना व २४ महिन्यासाठी करणार असाल आणि ५ लाखाचे परत मिळण्यायोग्य डिपॉजिट देणार असाल, तर तुम्हाला १,७५० रुपये इतके मुद्रांक शुल्क भरावे लागेल ( दोन वर्षाचे भाडे ६ लाख आणि व्याज एक लाख रुपये याच्या ०.२५ टक्के)
भाडेकरारासाठी नोंदणी करण्याची तरतूद
संपूर्ण भारतात लागू असलेल्या भारतीय नोंदणी कायद्याच्या सेक्शन १७ नुसार प्रत्येक अचल मालमत्तेचा प्रत्येक वर्षी अथवा एका वर्षांपेक्षा जास्त काळ असलेला करार यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. म्हणून राज्य कायद्याचा अवरोध नसेल तर प्रत्येक भाडेकरार जो १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी असेल त्याची नोंदणी करणे आवश्यक आह
तरीही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ तील सेक्शन ५५ नुसार कायदे अधिक कडक केले गेले आहेत, प्रत्येक भाडेकरार हा लिखित स्वरूपात असला पाहिजे आणि कितीही काळासाठी असला तरी त्याची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
नोंदणी करणे हि मालमत्ताधारकाची जबाबदारी आहे, यात हयगय केल्यास मालमत्ता धारकास दंड म्हणून रुपये ५००० तसेच ३ महिन्याचा कारावास होऊ शकतो. जर भाडेकरार नोंदला नसेल आणि मालमत्ताधारक व भाडेकरू यामध्ये विवाद झाल्यास सिद्ध होत नाही तोपर्यंत भाडेकरूने मांडलेले नियम व अटी ग्राह्य धरल्या जातील तसेच अचल मालमत्तेची त्याने मांडलेली स्थिती ग्राह्य धरली जाईल.
महाराष्ट्रात मालमत्ता कुठे, कशी आहे यावर भाडेकराराचे नोंदणी शुल्क अवलंवून आहे. जर मालमत्ता नगरपालिका क्षेत्रात असेल तर नोंदणी शुल्क रुपये १००० आणि मालमत्ता ग्रामीण भागात असेल तर रुपये ५०० इतके असेल. भाडेकरार अस्तित्वातच नसेल तर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भाडेकरूला भरावे लागेल.
भाडेकरारासाठी मालमताधारकाचे, भाडेकरूचे आणि साक्षीदार यांचे काही मूलभूत कागरपत्रे आवश्यक आहे जसे, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळख पुराव्याची प्रत (उदा. पॅनकार्ड ) आणि विजेचे बिल किंवा मालमत्तेचे कागदपत्रे, जसे इंडेक्स २ किंवा जी मालमत्ता भाड्याने द्यायची आहे त्या मालमत्तेची कर पावती.
अतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार
अतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार याबाबत तीन वेगवेगळ्या मुद्द्याच्या विचार करावा लगे. ज्यात अतिक्रमण दूर करणे, सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे आणि अतिक्रमणे नियमात बसवणे. या तिन्ही मुद्ययावतील कलमांची संक्षिप्त माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे. याठिकाणी प्रत्येक अतिक्रमणाच्या बाबतीत जमीन हि राज्य शासनाच्या मालकीची आहे हें लक्षात ठेवावे.
*** अतिक्रमण दूर करणे संबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार :-
१. कलम ५० :- शासकीय जमिनीवरील अतिक्रमण दूर करणे
स्पष्टीकरण :-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० मध्ये शासकीय जमिनीच्या अतिक्रमणाची माहिती देण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडे निहित केलेल्या कोणत्याही जमिनीवर किंवा किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर केलेली अतिकमणे किंवा अशा कोणत्याही जमीनीचा,कोणत्याही वस्तू फेरीने विकण्यासाठी किंवा जागेवर विकरीसाठी अनधिकृतरीत्या वापर केल्यास,जिल्हाधिकारी असे अतिकमण तडकाफडकी समाप्त किंवा दूर करु शकेल.
२. कलम ५०(१) :- अतिक्रमण क्षेत्रातील वस्तू घेवून जाणे बाबत
स्पष्टीकरण :-
किंवा फेरीने विकली जाणारी किंवा विकीस मांडलेली कोणतीही वस्तू काढून टाकण्यास भाग पाडू शकेल.या प्रयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्याने अतिकमण करणाऱ्यास नोटीस द्यावी.व त्यामध्ये त्याला नोटीसीमध्य्ये निश्चित केलेल्या दिनांकापू्र्वी अतिकृमण दूर करण्यास सांगावे व तसे करण्यास कसूर केल्यास,नोटिसीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकापासून नंतर जेवढया कालावधी पर्यंत अतिकमण चालू ठेवले असेल त्यातील प्रत्येक दिवसासाठी रु. ५० पेक्षा अधिक नाही इतक्या दंडास अतिकामक पात्र ठरेल याखेरीज, अतिकामक अतिकमणाच्या संपूर्ण कालावधीची आकारणी भरण्यास व रु.२,००० पेक्षा अधिक नाही इतका दंड भरण्यास पात्र ठरेल अशी समज द्यावी. कोणत्याही वस्तू अनधिकृतपणे फेरीने विकणारी किंवा विकणारी व्यक्ती ,जिल्हाधिकारी निश्चीत करील तेवढा परंतू रु ५० पेक्षा अधिक नाही इतका दंड भरण्यास पात्र ठरेल.
३. कलम ५१ :- अतिक्रमण क्षेत्र अतिक्रमणधारकाला देणेबाबत
स्पष्टीकरण :-
शासकीय जमीनीवरील केलेल्या अतिकमणाच्या बाबतीत,जर अतिकमण करणाऱ्या व्यक्तीची तशी इच्छा असेल तर,असे अतीकमण करण्यात आलेल्या जमिनीच्या किमतीच्या पाच पटीहून अधिक नसेल इतक्या रकमेचे प्रदान केल्यावर जमिनीवरील सर्वसाधारण वार्षिक जमीन महसूलाच्या पाच पटीहून अधीक नसेल इतकी आकारणी भरल्यावर जिल्हाधिकारी ती जमीन अतिकमण करणाऱ्या व्यक्तीला देऊ शकेल. जिल्हाधिकारी नियमानुसार विहीत केल्या असतील अशा अटी व शर्ती लादू शकेल. अतिकमण करणाऱ्या व्यक्तीला देण्यापुर्वी जिल्हाधिकाऱ्याने अपाला तसा उदेश असल्याची जाहिर नोटीस दिली पाहिजे आणि प्रस्तावीत भूप्रदानाबाबत त्याच्याकडे आलेल्या कोणत्याही हरकतींवर व सूचनांवर विचार केला पाहीजे. जाहीर नोटीस देण्यासाठी केलेला खर्च अतिक्रमण करणाऱ्याने दिला पाहिजे किंवा त्याच्याकडून तो वसून केला पाहिजे.
४. कलम ५२ :- अतिकमण करणाऱ्या व्यक्तीवर आकारावयाची दंड
स्पष्टीकरण :-
नियमाधिन करण्यासाठी ,अतिकमण करणाऱ्या व्यक्तीवर आकारावयाची दंडाची भोगवटा किंमत व आकारणी ,जिल्हाधिकाऱ्याने अशा मुल्यांकणाच्या वेळी त्याच क्षेत्रातील तशाच जमीनीच्या बाजार किंमतीच्या आधारावर ठरविली पाहिजे.या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय अंतीम असेल . आकारावयाची जमीन महसूलाची रक्कम ठरविताना ,वर्षाच्या कोणत्याही भागासाठी केलेला जमीनीचा भोगवटा हा संपूर्ण वर्षाचा म्हणून मोजण्यात यावा.
५. कलम ५३ :- एखादी व्यक्ती अनधिकृत पणे भोगवटा करीत असल्यास अशा व्यक्तीवर नोटीस बजावणे :-
स्पष्टीकरण :-
शासनाकडे विहित केलेल्या कोणतीही जमीन किंवा किनाऱ्यालगतचा प्रदेश (म्हणजे,भाडेपटटा,संमती नि परवाणगी यांचा कालावधी संपल्यामूळे किंवा त्या प्राधिकार पत्रावर जमीन देण्यात आली होती त्याचे निर्वापण झाल्यामूळे किंवा ज्या अटीवर किंवा शर्तीवर जमीन दिली होती त्याचे उल्लघण झाल्यामूळे) याचा एखादी व्यक्ती अनधिकृत पणे भोगवटा करीत असल्यास अशा व्यक्तीवर नोटीस बजावून,नोटिसिमध्ये विनिदिष्ट केलेल्या दिनांकापूर्वी जमीन किंवा किनाऱ्यालगतचा प्रदेश रिकामा करण्यास फर्मावून तिला जिल्हाधिकारी तडकाफडकी बेदखल करु शकेल. नोटिसीचे पालन करण्यात आले नाही तर,जिल्हाधिकाऱ्याला त्या व्यक्तीला जमिनीतून किंवा किनाऱ्यालगतच्या प्रदेशातून बेदखल करावे लागेल. तसेच, अशी व्यक्ती,अनधिकृतरीत्या भोगवटयाच्या संपूर्ण कालावधीच्या आकारणीच्या किंवा भाडयाच्या दुपटीपेक्षा अधिक नाही इतकी शास्ती भरण्यास पात्र ठरेल (कलम ५३) त्या व्यक्तीला तडकाफडकी बेदखल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने तिने उभारलेली कोणतीही इमारत किंवा बांधकाम काढून टाकण्यास,फर्माविणारी नोटीस त्या व्यक्तीवर बजावावी,त्या नोटीसीचे अनुपालन करण्यात आले नाही तर, जिल्हाधिकारी ती इमारत किंवा बांधकाम जप्त करण्यासाठी कार्यवाही करु शकेल.
सार्वजनिक सडकावरील अतिक्रमणे
सार्वजनिक सडका व खुली ठिकाणे या ठिकाणी होणारे अतिक्रमण आपल्याला नवे नाही. प्रत्येक वेळी काही कालावधीसाठी सदर ठिकाणे अतिक्रमण मुक्त होतात. परंतु पुन्हा त्यावर अतिक्रमण झालेले दिसून येते. आपल्याकडील गावांची, शहरांची व त्यातील पेठेची रचना पाहता ती रस्त्याच्या कडेला नाली, नाले किंवा सांडपाणी व्यवस्था करणारी आहे.
सार्वजनिक सडका व खुली ठिकाणे यावर होणारे व्यावसायिक अतिक्रमण व अडथळे काढून टाकणे :-
त्यामुळे अनपेक्षित त्या ठिकाणी एक प्रकारची हद्द तयार झालेली आहे. त्यामुळे अशा नाल्यांवर होणारे अतिक्रमण मोठे आहे. याबाबत पुढील दोन बाबी अतिक्रमण धारकांकडून मोठ्या प्रमाणात मांडल्या जातात.
१. आपण कोणाच्याही जागेवर नाही माझा गाला मागे आहे. हि समोरील जागा आमचीच आहे. आम्ही नाल्यावर फळी टाकून शेड केले आहे, ग्राहकाला बसण्यासाठी सावली केली आहे, पायऱ्या केल्या आहे. त्यामुळे हे अतिक्रमण नसून आमच्याच जागेवर पुढे फक्त येण्याजाणेस सुलभता व्हावी म्हणून हि व्यवस्थ.
२. आम्ही एमएसबीच्या खांबाच्या आत आहोत. त्यामुळे येथून रहदारी नाही. जरी अतिक्रमण हटावो मोहीम चालू झाली तरी ते खांबाच्या आतून शेड थोडीच काढणार आहे.
१. खुल्या जागेवरील अतिक्रमण :-
खुल्या ठिकाणे यात पटांगण किंवा प्रेक्षणीय स्थळ जवळील खुलाय जागा, नदी तलाव जवळील खुली जागा, बगीचा जवळील जागा अशा जागेचा समावेश होतो. त्या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने तेथे विविध प्रकारचे स्टॉल लागतात. ज्यात खाद्य पदार्थाचे स्टॉलचा समावेश मोठ्या प्रमाणात होतो.
२. सार्वजनिक सडकांच्या बाबत होणारे अतिक्रमण :-
सार्वजनिक सडकांच्या बाबत विचार केला तर त्या सडकेच्या कडेला असलेल्या दुकानदारांचे शेड, पायऱ्या स्वरूपात अतिक्रमण झालेले दिसते. आपल्याकडे मॉल संस्कृती नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची रांग असते. त्यालाच पेठेचे स्वरूप असते. आणि अशा सर्वच पेठ ह्या अतिक्रमित झालेल्या आहेत. यात केवळ रस्त्याच्या कडेला फिरते दुकान स्टॉल टाकून बसलेल्यांचाच समावेश नसून त्यात दुकानदारांनी शेड, पायऱ्या या स्वरूपातही अतिक्रमण करून पेठेचे रस्ते अत्यंत अरुंद केलेले आहेत. आज पेठेमध्ये चार चाकी गाडी घेऊन जाणे हे आव्हानात्मक काम झालेले आहे.
१. कोणतीही भिंत किंवा कोणतेही कुंपण, कठडा, खांब, गाला, व्हरांडा, ओटा, पायरी किंवा संरचना वस्तू किंवा इतर कोणतेही अतिक्रमण करणारे बांधकाम किंवा अडथळा बांधील किंवा उभा करील किंवा
२. कोणतीही पेटी गठन, पुडके किंवा कोणताही व्यापारी माळ किंवा इतर वस्तू जमा करील अथवा ठेवण्याची किंवा जमा करण्याची तजवीज करील किंवा
३. इमारतीच्या मालकाला किंवा भजोगवटादाराला पंचायतीने लेखी परवानगी दिल्यावाचून इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पुढे होईल अशी कोणतीही संरचना म्हणजेच व्हरांडा, सज्जा, खोली, जिना, गॅलरी, उभी करील.
४. किंवा ज्या शर्तीच्या अधिनतेने कोणतेही पूर्वक्त परवानगी देण्यात आली असेल अशा कोणत्याही शर्तीचे किंवा अशा कोणत्याही प्रेक्षेपांच्या संबंधात केलेल्या कोणत्याही उपविधीच्या तरतुदींचे उल्लंघन करील किंवा खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरानात लागवड करील.
५. किंवा त्याचा अनधिकृत उपरोक्त करील, त्यास अपराधसिद्धीनंतर ५० रु. पर्यंत पाठविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
६. आणि उल्लंघन चालू राहिल्याचा बाबत अशा पहिल्या उल्लंघनास अपराध सिद्धी झाल्यांनतर असे उल्लंघन ज्या दिवशी चालू राहील त्या त्या दिवशी प्रत्येकी ५ रु वाढविता येऊ शकते इतक्या जाडा द्रव्यदंडास ती पात्र होईल.
ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे
सरकारी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास, अतिक्रमण करणा-या व्यक्तीची इच्छा असल्यास, जिल्हाधिकारी, अतिक्रमण झालेली जमीन अतिक्रमकाला, जमिनीच्या किमतीच्या पाच पटीपेक्षा अधिक नसेल एवढी रक्कम व सर्वसाधारण जमीन महसुलाच्या पाच पटीपेक्षा अधिक नसेल एवढी आकारणी मिळून बनलेल्या रकमेला ती जमीन प्रदान करू शकेल. जिल्हाधिका-याला जमिनीच्या प्रदानाबाबत, नियमांखाली विहित करता येतील अशा अटी व शर्ती घालता येतील. अतिक्रमकाला जमीन प्रदान करण्यापूर्वी जिल्हाधिका-याने जमीन प्रदान करण्याचा त्याचा उद्देश असल्यासंबंधीची सार्वजनिक नोटीस देउन प्रस्तावित प्रदानास काही आक्षेप अगर सूचना असल्यास त्याचा विचार करावयाचा असतो. सार्वजनिक नोटिशीकरिता येणारा खर्च अतिक्रमकाने द्यावयाचा असतो अगर त्यांच्याकडून तो वसूल करावयाचा असतो.
ग्रामपंचायतीच्या दृष्टीने अत्यंत अंवेदनशील विषय म्हणजे अतिक्रमण साधारणतः जी गवे मोठ्या रस्त्यालगत आहेत ज्या गावाची लोकसंख्या ५००० पेक्षा जास्त आहे. ज्या गावात मोठा बाजार भरतो. जेथे बस स्थानक आहे. हायस्कुल आहे, अशा ग्रामपंचायतीत अतिक्रमण हि समस्या प्रकर्षाने जाणवते. अतिक्रमण मुक्त ग्रामपंचायत आज तरी अस्तित्वात नाही. म्हणून सर्वच अतिक्रमणे काढून टाकावीत हे उचित होणार नाही. कारण यातून बेरोजगारी व वाद अशा दोन्ही समस्या एकाच वेळी उभ्या राहतील. म्हणून अतिक्रमण धारकांना स्वस्तात किंवा कमी भाडेतत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स सारख्या मार्गातून समन्वयाने अतिक्रमणे दूर करावे लागेल. परंतु जेंव्हा अतिक्रमण हे गावातील मानवी जीवनांवर हावी होईल किंवा त्याचा अतिरेक होऊन अव्यवस्था वाढेल तेंव्हा मात्र असे अतिक्रमण दूर केलेलेच बरे. त्यासाठी खालील नियम सदस्य व नागरिकांना माहिती असावेत.
१. अतिक्रमणे दूर करणे :-
१. गावातील सार्वजनिक रस्ते, खुल्या जागा वरील अडथळे/ अतिक्रमणे दूर करण्याचा पंचायतीस अधिकार आहे.
२. गायराने जिल्हाधिकारी यांनी पंचायतीकडे तात्पुरत्या वापरासाठी वर्ग केलेल्या जागेवरील अतिक्रमणे जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन ग्रामपंचायतीस दूर करता येतील.
३. अशी अतिक्रमणे ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधीची असतील तर ती काढण्याचा पंचायतीस अधिकार नाही.
४. अशी अतिक्रमणे जिल्हाधिकारी ठरविलं त्या पद्धतीनें ती अतिक्रमणे दूर केली जातात.
२. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण व कारवाई :-
१. असे अतिक्रमण काढणेच ग्रामपंचायतीस अधिकार आहे.
२. कासूरदार व्यक्तीविरुद्ध पंचायतीस फोजदारी फिर्याद दाखल करता येते.
३. अतिक्रमण कारवाई विरोधी अपील :-
१. गायरान अतिक्रमण जिल्हाधिकारी यांनी काढून टाकले असेल तर विभागीय आयुक्तकडे अपील करता येते.
२. पंचायतीच्या सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण पंचायतीने काढल्यामुळे जर एखादी व्यक्ती व्यथित खाली असेल तर तिला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे ३० दिवसांचे आत अपील करावे लागते.
४. सार्वजनिक जागा मालकी हक्क व विवाद :-
१. असा अधिकार पंचायतीस नाही. संबंधित व्यक्तीने दिवाणी न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागतो.
२. एखाद्या सार्वजनिक जागेवर ग्रामपंचायत व खाजगी व्यक्ती दोन्ही मालकी हक्क सांगत असल्यास निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे.
३. अतिक्रमण व इमारती उभारण्यावर नियंत्रण :-
१. कोणतीही व्यक्ती पंचायतीच्या पूर्वपरवानगी शिवाय गावाच्या सीमेत कोणतीही इमारत उभारणार नाही अथवा उभारण्यास किंवा पुन्हा उभारण्यास सुरुवात करणार नाही.
२. परवानगीसाठी केलेला अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पंचायतीने तत्संबंधी असली परवानगी दिल्याबद्दल किंवा नाकारल्याबद्दल कळवले नाही तर परवानगी देण्यात आलेली आहे असे गृहीत धरले जाईल. परवानगी नाकारल्यास किंवा शर्तीच्या अधिनतेने परवानगी दिल्याच्या बाबतीत पंचायत अर्जदाराला त्याची करणे कळविणे आणि परवानगी नाकारण्याच्या किंवा शर्तीसह परवानगी देण्याच्या अशा करूनही आदेशाविरुद्ध अशा रीतीने तो कलाविल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत स्थायी समितीकडे अपील दाखल करता येईल.
३. उभारण्याचे किंवा पुन्हा उभारण्याचे कोणतेही योजलेले काम सुरु करण्याचा पोट कलम १ कण्व २ खाली हक्क प्राप्त झालेली कोणतीही व्यक्तीचे काम चालू करण्याचा तिला ज्या दिनांकाला याप्रमाणे हक्क प्राप्त झाला त्या दिनांकापासून एक वर्ष संपल्यानंतर अशा कामाला प्रारंभ करणार नाही. मात्र पूर्ववरती पोट कलमाच्या तरतुदींचे नव्याने अनुपल करून तिला अशा रीतीने पुन्हा हक्क प्राप्त झाला असेल तर ती गोष्ट वेगळी.
४ जी कोणतीही व्यक्ती अशा परवानगी शिवाय किंवा पोट कलम १ च्या किंवा अमलात असलेल्या उपविधीच्या तरतुदींच्या किंवा पंचायतीने लादलेल्या कोणत्याही अटींच्या विरुद्ध होईल अशा कोणत्याही रीतीने कोणतीही इमारत उभारली किंवा पुन्हा उभारली अथवा उभारण्यास किंवा पुन्हा उभारण्यास सुरुवात करील तिला ५०रु. पर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
सरकारी जमिनीची विल्हेवाट
अधिनियमाचे कलम ३८ अन्वये जिल्हाधिका-याला, नियमान्वये विहित केले जाईल अशा कालावधीकरिता, अशा प्रयोजनार्थ, व अशा शर्तीवर कोणत्याही व्यक्तीला एखादी सरकारी जमीन प्रदान करून किंवा करारावर पट्ट्याने देण्याचा प्राधिकार झाला आहे.
शासकीय जमीन
शासकीय जमिनी कब्जेपट्टा अथवा भाडेपट्ट्याने देण्यात येतात. मुदतीनंतर या कब्जेपट्ट्याचे, भाडेपट्ट्याचे नूतनीकरणही केले जाते. त्याची मुदत वाढवूनही घेतली जाते. जागा कब्जेपट्टा, भाडेपट्ट्याने देण्याची तसेच, त्याला मुदतवाढ देणे, त्याचे नूतनीकरण करणे, त्याकरिता शुल्क आकारणे आदी सर्वच अधिकार राज्य शासनाला होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३७ अ व पोटकलम (१) व (२) नुसार असलेल्या या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या ३७अ (१) व (२) मधील अधिकारात राज्य शासनाने बदल केला आहे. राज्य शासनाकडे असणारे हे अधिकार आता थेट जिल्हाधिकार्यांनाच देण्यात आले आहेत. त्याबाबतचा आदेश दि. १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता जिल्ह्यातील शासकीय जमीन कब्जेपट्ट्याने देणे, भाडेपट्ट्याने देणे, सध्या असलेल्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करणे, त्यावरील नजराणा, आकार शुल्क निश्चित करणे, त्यामध्ये वाढ करणे आदी सर्वच कामे आता जिल्हाधिकार्यांकडे होणार आहेत. यामुळे अशा कामाकरिता पुणे-मुंबईला वारंवार फेर्या माराव्या लागणार नाहीत.
वर्ग २ च्या जमिनीच्या विक्री व वापरात बदल परवानगीचे अधिकारही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. राज्य शासनाकडे नियंत्रित सत्ता प्रकारातील वर्ग दोनच्या जमिनीबाबत असलेले अधिकार २ सप्टेंबर १९८३ साली विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. यानंतर २९ मार्च २०१२ रोजी जमीनविषयक कामांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार महापालिका व अ वर्ग नगरपालिका हद्दीतील जमीनविषयक कामकाज जिल्हाधिकार्यांकडे तर ब वर्ग नगरपालिका व सर्व ग्रामीण भागातील जमीन विषयक अधिकार अपर जिल्हाधिकार्यांकडे देण्यात आले होते. आदेशानुसार आता वर्ग दोनच्या जमिनींच्या विक्रीची परवानगी देण्याबाबत तसेच त्याच्या वापरातील बदल झाला असल्यास त्याकरिता देण्यात येणारी परवानगी देण्याचे अधिकारही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
*** या नियमांमध्ये वापरण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या संज्ञा व शब्दप्रयोग यांच्या व्याख्या खाली दिल्या आहेत :-
१. मागासवर्ग :-
म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध, परिशिष्ट एकमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विमुक्त जाती, परिशिष्ट दोन मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या भटक्या जमाती व नियमांना जोडलेल्या परिशिष्ट तीनमध्ये विनिर्दिष्ट केलेले इतर मागास वर्ग.
२. निर्वाहक क्षेत्र म्हणजे :-
अ) कोरडवाहू पिकांच्या जमिनीच्या किंवा जिराईत जमिनीच्या बाबतीत ६.४७ हेक्टर (म्हणजेच १६ एकर), किंवा
ब) हंगामी ओलिताच्या जमिनीच्या किंवा साळीच्या किंवा भाताच्या जमिनीच्या बाबतीत ३.२४ हेक्टर (म्हणजेच ८ एकर), किंवा
क) बागायती किंवा बारमाही ओलिताच्या जमिनीच्या बाबतीत १.६२ हेक्टर (म्हणजेच ४ एकर),
एखाद्या व्यक्तीने धारण केलेली जमीन ही उपरोल्लिखित जमिनीच्या दोन किंवा अधिक वर्गातील जमिनींची मिळून झाली असेल त्याबाबतीत एक हेक्टर बागायती जमिनीबरोबर दोन हेक्टर साळीची जमीन किंवा चार हेक्टर कोरडवाहू पिकाची जमीन या प्रमाणाच्या आधारावर निर्वाहक क्षेत्र ठरवण्यात येईल.
३. लागवडीखाली न आलेली जमीन :-
म्हणजे, या नियमान्वये ती देण्याच्या लगत पूर्वीच्या सतत तीन वर्षाच्या कालावधीत लागवडीखाली नसेल अशी जमीन.
४. कुटुंब :-
जमीन देण्याच्या प्रयोजनार्थ एखाद्या व्यक्तीच्या संबंधात अविभक्त हिंदू कुटुंब व्यतिरिक्त कुटुंब या संज्ञेत ज्याचा संपत्तीत वेगळा वाटा असेल किंवा नसेल असा पती पत्नी अप्राप्तव्यय मुलगे, अविवाहित मुली, अवलंबून असलेले भाऊ, बहीण आणि आई-वडील यांचा अंतर्भाव होईल परंतु संपत्तीत वेगळा वाटा असलेले सज्ञान भाऊ आणि अशा व्यक्तीवर अवलंबून नसलेले वडील किंवा आई यांचा अंतर्भाव होणार नाही.
बिल्डरकडून एन ए नसलेल्या जमिनीवर बांधलेली घरे विकत घेणे
बिल्डरकडून एन ए नसलेल्या जमिनीवर बांधलेली घरे विकत घेतलेली असल्यास :-
बिल्डरने ती जमीन डेव्हलपमेंट म्हणून घेतलेली असल्यास तिथे सोसायट्या करावयाची असल्यास सदर भूखंड हा अजूनही मूळ मालकाच्या नावावर असल्यास आता सोसायटी झाल्या नंतर तो सोसायटीच्या नावावर करायचा असल्यास
१. इतर हक्कातील कुळ कायद्यातील नमूद घटना घडल्या शिवाय कमी होत नाही महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम १४,१५ प्रमाणे कुळ कमी करण्याच्या तरतुदी आहेत या तरतुदी कलम ३१ ला डीईन आहेत.
२. एखादे मिळकती संदर्भात दिवाणी न्यायालयात वाद असल्यास त्याची माहिती अशी जमीन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या इसमास होणे करता न्यायालयात दावा प्रलंबित असले बाबत दुय्यम निबंधकाकडे नोंद केली जाते या प्रक्रियेस लॅटिन भाषेत Lis – Pendant असे संभोदले जाते.यामुळे जमिनी विक्रीवर निर्बंध येत नाही.
जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय तपासणी करण्याचा अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना आहेत ते आपल्या तालुकास्तरीय अधिकार तहसीलदारांना बहाल करू शकतात तसे केले असल्यास तहसीलदार पोलीस स्टेशन तपासू शकतात.
७/१२ आणेवारी करण्यासाठी आणेवारी म्हणजे मिळकतीतील साधारकांचे हिस्से निश्चित करणे. हिस्स्याबाबत वाद नसेल तर परस्पर संमतीने हिस्से निश्चित करता येतील मात्र वाद असेल तर न्यायालय हिस्से निश्चित करून देते.
७/१२ विभक्त करण्याकरिता तुकडेबंदी व तुकडे जोड कायद्यानुसार विभक्तीकरणामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र टायर होता कामा नये जर मिळकत वारसा हक्काने असल्यास प्रत्येकाचा हक्क निश्चित करणे आवश्यक जर प्रत्येक व्यक्तीचा हिस्सा निश्चित केला असल्यास तहसीलदार यांचेकडे आकारफोड करून मिळण्यासाठी अर्ज करा.
हद्द निश्चित करण्यासाठी खरेदी खातात खरेदी केलेल्या जमिनीचे वर्णन केलेले असते त्या आधारे हद्दी निश्चित करता येतात अथवा प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द निश्चित होते.
वडिलोपार्जित जमीन जर तिचे १९७२ साली गट पडले तेंव्हा चुकून ७/१२ वर कमी अधिक जमीन लागली आहे तेंव्हा ते दुरुस्त करणेसाठी उपसंचालक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करावा लागेल.
लग्न झालेल्या व वर्ग ३ पदावर काम करत असेलेल्या महिलेच्या नॉनक्रमिलेअर प्रमाणपत्रासाठी वडिलांचे प्रमाणपत्र ग्राह्य असते.
जमीन जर नियंत्रित सत्ता प्रकार असेल तर वाटणी पत्र तयार करता येते वाटणी पत्रामध्ये जर संमती असेल तर हिस्सा कमी किंवा जास्त लावता येत नाही कमी जास्त क्षेत्राप्रमाणे हक्कसोड पत्र / बक्षीस पत्र करावे लागते.
दुसऱ्या जिल्ह्यात जर जमीन विकत घेतली असेल तर त्या जमिनीच्या ७/१२ वर नाव टाकण्यासाठी शेतकरी दाखल्याची गरज असतेच. महाराष्ट्रात कुळ कायद्याचे कलम ६३ अन्वये बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खसरेदी करता येत नाही.