रो हाऊस Row House
रो हाऊस
स्व तःचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. प्रत्येक जण काबाडकष्ट करून निवाऱ्याकामी आपल्या कुवतीनुसार सदनिका, जमिनीचा तुकडा अथवा छोटेसे घर अथवा बंगला खरेदीच्या प्रयत्नांत असतो. कागदपत्रांची तपासणी योग्य कागदतज्ज्ञाकडून तपासून न घेता मित्रमंडळी अथवा इस्टेट एजंटच्या शब्दांवर विश्वास ठेवून असे व्यवहार होतात व बऱ्याच वेळा घर अथवा मिळकत खरेदीच्या व्यवहारात आपली फसगत होऊ शकते. अशी फसगत होऊ नये म्हणून गृहखरेदीचा व्यवहार करताना कोणती कागदपत्रे पाहावीत, काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
बिल्डरकडून रो-हाऊस घेताना :-
१) बांधकाम उद्योजकाने याने जी जमीन रो हाऊस प्रकल्पासाठी विकत घेतली त्या जमिनीचा शोध अहवाल बांधकाम उद्योजकाच्या वकिलाने घेतला असेल त्या शोध अहवालाची खरी नक्कल मागा. ती निष्णात वकिलामार्ङ्गत तपासावी. कारण जमीन वादातून मुक्त असेल तरच रो हाऊसचे बांधकाम निर्वेध मानता येईल.
२) रो हाऊस ज्या जमिनीवर बांधले आहेत त्या जमिनीबाबत मूळ जमीन मालक आणि बांधकाम उद्योजक यांच्यामध्ये झालेल्या जमीनविषयक कराराच्या खऱ्या नकला. कुलमुखत्यारपत्र विकसन करार असेल तर खरेदी खत यांच्या खऱ्या नकला.
३) संबंधित जमीन एन.ए. बिनशेती केल्याची जिल्हाधिकारी यांच्या हुकुमाची खरी नक्कल.
४) रो हाऊसचा आराखडा – नकाशा मंजूर केल्याची जिल्हाधिकारी आणि नगररचना खात्याच्या हुकुमाची खरी नक्कल
५) आराखडा नकाशा प्रत्यक्ष पहा.
६) बांधकाम उद्योजकाकडून जमिनीच्या मालकी सह रोहाऊस (Registerd Sale Deed) खरेदीखताने विकत घ्या.
७) बांधकाम उद्योजकाकडून स्वतंत्र बंगला विकत घेताना प्रत्येक भूखंडाचा मंजूर आराखडा आणि त्यावरील बंगला याबाबतही वरीलप्रमाणे कागदपत्रे तपासा.
८) निष्णात वकिला मार्फत दुय्यम निबंधकाच्या कार्यालयातील शोध अहवाल मिळवा.
९) जमिनीचे निर्वेध हस्तांतरण आणि सर्व परवाने घेऊन बांधलेली अधिकृत इमारत हे दोन महत्त्वाचे पैलू लक्षात घेऊन शोध अहवाल घ्यावा.
१०) जमीन मालकाचे नाव व पत्ता
११) विकसनकर्त्यांचे नाव व पत्ता
१२) वास्तुविशारदाचे नाव व पत्ता
१३) वास्तुविशारदाचे लायसन्स नंबर व मुदत
१४) स्ट्रक्चरल इंजिनीअरचे नाव, पत्ता, लायसन्स नंबर
१५) साईटचा पत्ता
१६) बांधकाम परवानगी क्रमांक व दिनांक
१७) भूखंडाचे एकूण क्षेत्र
१८) प्रत्येक भूखंडाचे क्षेत्र
१९) मंजूर इमारतींची संख्या
२०) जोत्याचे क्षेत्र
२१) पाणी पुरवण्याची सोय
ज्या सदनिकाधारकांनी ‘गुंठेवारी दाखला’ मिळवला आहे त्याची निष्णात वकिला मार्फत तपासणी करा आणि नंतर खरेदी करा.