New ration card नवीन रेशनकार्ड आवशक्य माहिती
नवीन रेशनकार्ड मिळनेकामी आवश्यक कागदपत्रे
१.नाव कमी केलेचा तहशिलदार यांचा दाखला सदर दाखला दुसरया तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो.
२.नाव कमी केलेचा तलाठी यांचा दाखला सदर दाखला दुसरया तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो.
३.सरपंच रहिवाशी दाखला ग्रामीण भागासाठी
४.नगरसेवकाचा रहिवाशी दाखला–शहरी भागासाठी
५.तलाठी यांचा कडील रहिवाशी दाखला
६.कामगार तलाठी यांचा कडील उत्पन्नाचा दाखला
७.ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला
८.मिळकती बाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल
९.भाड्याने रहात असेल तर घरमालकाचे समतीपत्र –प्रतिज्ञापत्र कोरया कागदावर पाच रु.चे कोर्ट फी स्टँप सह
१०.नवीन कार्ड मिळणे कामी स्वतःचे प्रतिज्ञा कोरया कागदावर पाच रु.चे कोर्ट फी स्टँप सह
११.विहित नमुन्यातील अर्ज रु.पाच च्या स्टँप सह
१२.लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला व इतर पुरावे कार्डधारकाच्या मागणीप्रमाणे.
१३. पुस्तिकाची सत्यप्रत
१४.कोरल बँकिंग / राष्ट्रियकृत बँकेतील पती ,पत्नी यांच्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक दर्शविणारे बँकेचे पास बुक सत्यप्रत
१५.रेशनकार्ड धारकाचे दोन फोटो.
———————————————————————————
रेशनिंग रद्द/बाद झाले असल्यास नवीन मिळणेकामी आवश्यक कागदपत्रे
१.स्वस्त दुकानदार यांचा क गटातील दाखला
२.कामगार तलाठी यांचा क गटातील दाखला-बोगस शिधापत्रिका मोहिमेंतर्गत फॉर्म न भरले मुळे युनिट सह नवीन कार्ड देणे हरकत नाही.
३.रेशनकार्ड धारकाचे मतदान ओळखपत्र
४.कामगार तलाठी यांचा कडील रहिवाशी दाखला
५. कामगार तलाठी यांचा कडील उत्पन्नाचा दाखला
६.मिळकती बाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल
७.मूळ रेशनकार्ड
८.विहित नमुन्यातील अर्ज रु.पाच च्या स्टँप सह
९.लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला व इतर पुरावे कार्डधारकाच्या मागणीप्रमाणे
१०. पुस्तिकाची सत्यप्रत
११.कोरल बँकिंग / राष्ट्रियकृत बँकेतील पती ,पत्नी यांच्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक दर्शविणारे बँकेचे पास बुक सत्यप्रत.
१२.रेशनकार्ड धारकाचे दोन फोटो.