रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र आवशक्य माहिती
रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र
व्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवासी आहे.हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
जरी व्यक्तीचे रेशनकार्ड,मतदानकार्ड,आधारकार्ड,ही कागदपत्रे व्यक्ती राहत असलेल्या ठिकाण दर्शवत असले तरी रहिवासी प्रमाणपत्र हे रहिवासी दर्शवणारे प्रमाणित अंतिम प्रमाणपत्र असते. लायसेन्स,नोकरी,संपत्ती,व्यवसाय नोदणी इ.साठी याची आवश्यकता असते.रहिवासी प्रमाणपत्र हे केवळ प्रत्येक राज्य तेथील राहणाऱ्या नागरिकांना देत असल्याने एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र काढण्यास पात्र नसतो.तसे करणे कायद्याने गुन्हा ठरतो.
———————————————————————————
प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
* विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टँप लावलेला असतो.
* शिक्षित असल्यास शाळा सोडल्याचा दाखला
* रहिवासी असल्याबाबतचा तलाठी यांचा दाखला
* शपथपत्र कोर्ट फी स्टँप सह व्यक्ती अशिक्षित असल्यास तसे त्यात नमूद करावे.
* लाईटबिल / घरपावती / भाडेपत्र / रेशनकार्ड / उतारा.या पैकी एक
* निवडणूक ओळखपत्र नसल्यास तसे लिहून घेणे.
* दहावी उतीर्ण असल्यास दहावीचे प्रमाणपत्र झेरॉक्स
रहिवासी प्रमाणपत्रामध्ये गाव पातळीवर तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र मराठी मध्ये तहसील कार्यालयाकडून दिले जाणारे डोमोसाईल / रहिवासी प्रमाणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयातून /मार्फत दिले जाणारे राष्ट्रियत्व प्रमाणपत्र असे कामानुसार प्रमाणपत्र वापरता येतात.केंद्रीय नोकर भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीकरिता डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यकता असते.
———————————————————————————
सेन्ट्रल ओ. बी. सी. प्रमाणपत्र
महाराष्ट्र मध्ये असलेल्या NT SBC OBC प्रवर्गातील उमेदवारांना केंद्राच्या नोकरीमध्ये OBC प्रवर्तनातून अर्ज सादर करता येतो. परंतु त्यासाठी सदर प्रवर्गातील आपण आहोत हे दर्शविण्यासाठी सेन्ट्रल प्रमाणपत्राची आवश्यकता असते.हे प्रमाणपत्र सेतू अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले जाते. यासाठी
प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
१.शाळा सोडल्याचा दाखला
२.उत्पन्नाचा तीन वर्षांचा तहसील कार्यालय येथून काढलेला दाखला ३.रहिवासी दाखला तलाठी यांचा
४.रेशनकार्ड झेरॉक्स
५.जातीचा दाखला.द्यावा.