जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
. विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टँप सह.
. गाव नमुना ७/१२ चा उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा.
. मोजणी फी भरण्या बाबतचे चलन.
. मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा ,अगर जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील.
. लगत खातेदारांचे नाव व पत्ता.
महत्वाच्या सूचना
१ शासकीय जमीन मोजणी करते वेळी त्याची चित्रफित शक्य झाल्यास काढून ठेवावी.
२.कालांतराने हद्दी संबंधी वाद निर्माण झाल्यास चित्रफित / व्हीडीओ शुटींग महत्व्याचा पुरावा म्हणून मांडता येतो.
३.जमीन किंवा प्लॉट मोजणी झाल्यानंतर आपल्या हद्दीत कुंपण टाकून घ्यावे.
४. प्लॉट किंवा जमीन खरेदी करते वेळी शासकीय जमीन मोजणी करूनच विकत घ्यावे.
त्यामुळे पुढे शेजारील व्यक्तींचा किंवा त्या जमिनीच्या वारसांचा त्रास होत नाही.
५. साधी मोजणी १८० दिवस तातडीची मोजणी ८० दिवस अति तातडीची मोजणी ६० दिवस असा साधारणता कालावधी आहे.