
करारपत्र (Agreement/Contract)
हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे दोन किंवा अधिक पक्षांमध्ये ठराविक अटी व शर्तींवर सहमती दर्शवली जाते. करारपत्राचा उपयोग व्यवसायिक व्यवहार, मालमत्ता व्यवहार, सेवा करार, भाडेकरार, भागीदारी करार, किंवा अन्य कायदेशीर व्यवहारांमध्ये केला जातो.
Agreement/Contract
करारपत्र
घर भाडेपट्याचे दस्तखत
ऊस तोडीचे काम करण्यासाठी करारपत्र
कृषि उत्पन्न बाजार समिती करारपत्र
चारा छावणी साठीचे करारपत्रक
ऊस तोडीचे काम करण्यासाठी ॲडवान्स रक्कम देण्या बाबत करारपत्र
बांधकाम करारनामा अंडर ग्राँंऊड फलोअर सहित चार मजली बिल्डींगचे बांधकाम
एक वर्षे शेतमजुर म्हणुन काम करणार आहे
समाजकल्याण विभाग करारनामा
शालेय पोषण आहार योजना स्वयंपाकी नेमणूक कारापत्र
औद्योगिक सह.वसाहत मर्या. करारनामा
धंद्याचे बेचनदस्त
शेअर्स संबंधी बंधपत्र
भाडेतत्वावर वातानुकुलीत यंत्र खरेदीचा करार
जाहिरात कारार
डिझाईन विक्री कारार
गुडविल संबंधी विक्री कारार
कायम विक्रीचा करारनामा / खरेदी खत
करारपत्र तयार करताना समाविष्ट असणारे महत्त्वाचे घटक:
1. शीर्षक:
कराराचा प्रकार स्पष्ट करणारे शीर्षक द्या (उदा. भाडेकरार, सेवा करार, विक्री करार इ.).
2. कराराचा दिनांक:
करार तयार करण्याचा आणि स्वाक्षरी करण्याचा दिनांक नमूद करा.
3. पक्षांचे तपशील:
पहिला पक्ष (First Party): नाव, पत्ता, ओळख क्रमांक (आधार/पॅन) किंवा कंपनीचे नाव.
दुसरा पक्ष (Second Party): नाव, पत्ता, ओळख क्रमांक किंवा कंपनीचे नाव.
4. उद्देश:
कराराचा उद्देश स्पष्ट करा. (उदा. मालमत्तेची विक्री, सेवा देणे-घेणे, भाडेकरार इ.)
5 अटी व शर्ती:
- दोन्ही पक्षांमध्ये मान्य असलेल्या सर्व अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद करा.
- अटींचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई याचा उल्लेख करा.
6. हक्क व जबाबदाऱ्या:
- प्रत्येक पक्षाच्या हक्कांची व जबाबदाऱ्यांची माहिती द्या.
7. संपूर्ण कराराचा कालावधी:
- करार किती कालावधीसाठी वैध आहे, याचा स्पष्ट उल्लेख करा.
8. कायदेशीर उपाय:
- करारातील अटींचे पालन न केल्यास उपलब्ध कायदेशीर उपाय नमूद करा.
9. स्वाक्षरी:
- दोन्ही पक्षांचे स्वाक्षरीसाठी जागा ठेवा.
- किमान दोन साक्षीदारांचे नाव, पत्ता आणि स्वाक्षरी असावी.
10. मुद्रांक व नोंदणी:
- करारपत्र कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी त्यावर योग्य मुद्रांक (Stamp Duty) लावून ते नोंदवावे.